मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची ही प्रश्नावली होती. हा घोटाळा उघड करून तुम्ही ऑफिशियल सिक्रेसी घोटाळ्याचं उल्लंघन केलंय, असा सवाल मला केला गेला. मला आरोपी किंवा सहआरोपी बनवलं जाईल असे प्रश्न केले. मी त्याला उत्तर दिलं. माझ्यावर ऑफिशियल सिक्रसी अॅक्ट लागू होत नाही. माझ्यावर लागू झाला तर व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे. मी घोटाळा बाहेर काढला मी व्हिसल ब्लोअर आहे असं मी तपास यंत्रणांना सांगितलं आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईच्या सायबर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा दोन तास जबाब नोंदवला गेला. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन चौकशीबाबतची माहिती दिली. तसेच ठाकरे सरकारवरही टीकास्त्र सोडलं.