अकोल्यात आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आजपासून क्रिकेटचे खुले सामने भरवले आहेत. या सामन्यांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तर यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत अंजली आंबेडकर यांनाही खेळाचा मोह आवरला नाही. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.