देशाची मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशसह इतर ४ राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचे कल हाती येताहेत. त्यात उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपला कलांमध्ये बहुमत मिळताना दिसतंय. त्यामुळे पुण्यातील भाजपा कार्यालयाबाहेर मोठा जल्लोष सुरू आहे. पुण्यात भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना लाडू भरवत, ढोल-ताशा वाजवत आणि घोषणाबाजी करत भाजप आपल्या विजयाचं सेलिब्रेशन करत आहे.
#AssemblyElections2022results #NarendraModi #AmitShah #YogiAdityanath #Uttarakhandassemblyelectionresults #punjabassemblyelectionresults #goaassemblyelectionresults #MarathiNews #esakal #SakalMediaGroup