देवेंद्र फडणवीस आज जे काही आरोप करत आहेत ते केवळ स्वतः च्या स्वार्थासाठी करत असून यात महाराष्ट्र बदनाम झाला तरी त्यांना त्याची पर्वा नाही. गोष्ट खोटी असली तरी ती खरी कशी वाटेल हे सांगण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. म्हणूनच ते आजच्या राजकारणातील नटसम्राट आहेत. नारायण राणे यांच्या भ्रष्टाचार व गुन्हेगारीवर विधानसभेतच त्यांनी जोरदार आरोप केले होते तेच फडणवीस आज राणे यांच्याबाबत मुग गिळून गप्प बसले आहेत.अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे देणारे फडणवीस त्याच अजितदादांबरोबर पाहाटे गुपचूप शपथविधी उरकतात तेव्हा भ्रष्ट व खोटारडे कोण आहेत ते जनता जाणते.