पुण्यातील RTO अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या बंगल्यावर आज पहाटे ५ वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. शिवसेनेचे अनिल परब यांच्या परिवहन खात्याशी संबंधित RTO चे वरिष्ठ अधिकारी आहेत. अनिल देशमुखांशी संबंधित १५० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी खरमाटेंच्या घरी आज पहाटे आयकरचा छापा पडला. मागील ३ महिन्यांपासून बजरंग खरमाटे यांची चौकशी सुरु आहे. याआधीही दोन वेगवेगळ्या विभागांकडून खरमाटेंच्या घरी छापेमारी करण्यात आली. पण यावेळेस आयकर विभागाकडून कागदपत्रांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळतेय. याशिवाय अनिल परबांशी जवळचं नातं असल्यानं खरमाटेंनी कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता.
#bajrangkharmate #anildeshmukh #anilparab