धक्कादायक! एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश

2022-03-08 130

एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी संप सुरुच आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर आगारातील एका 54 वर्षीय एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. शासनाने कामावर रुजू होण्याची नोटीस पाठवल्याच्या भीतीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुजावर आरिफ शेख हसन असं या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते शिरपूर आगारात वाहक पदावर कार्यरत होते. सध्या सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ते सहभागी होते. आगारातील जे कर्मचारी कामावर येत नव्हते त्यांना शासनाच्या वतीने नोटीसही देण्यात आलेली होती. सोमवारी सायंकाळी आगाराकडे तयारी करून निघाले असता त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना शिरपूर शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी त्यांना मृत घोषित केले. एसटी कर्मचारी मुजावर आरिफ शेख हसन यांना पत्नी आणि पाच मुले असा परिवार आहे. आरिफ यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी सांगितला.

Videos similaires