'पद आणि अधिकाराचे तारतम्य नाही', शरद पवारांचा राज्यपालांना जोरदार टोला

2022-03-06 110

'राज्यपाल यांनी काही भाषण केलं. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केलं. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली' असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली. राज्यपालांनी अशी वक्तव्यं केल्यानंतर कोण तुम्हाला विचारणार आहे, लोक म्हणतात यांच्या नादाला न लागणे बरे' असा टोलाही पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.

Videos similaires