चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात अफुची शेती केली जात असल्याची माहिती चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिसांना मिळाली होती. कोट्यवधीच्या अफूच्या शेतीचा पर्दाफाश करत पोलिसांनी कारवाई केलीये. चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात १ हेक्टर ३० आर म्हणजे तब्बल तीन एकर शेती क्षेत्रात अफूच्या झाडांची लागवड केली गेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज कारवाई करीत या शेतीचा पर्दाफाश केला.