मुबंई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; थोडक्यात कुटुंब बचावले

2022-03-04 235

जिल्ह्यातील मुबंई गोवा महामार्गावर कोलाड खांब येथे भीषण अपघात घडला. एका घरात भरधाव मालवाहू कंटनेर घुसल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडली. घरातील कुटूंब या अपघाताने थोडक्यात बचावले आहेत तर चालक गंभीर जखमी झाला आहे. माणगाव कोलाडकडून नागोठणेच्या दिशेने जाणाऱ्या चालकाचा खड्यामुळे कंटेनरवरील ताबा सुटला. यामुळे मार्गालगत असलेल्या वस्तीमधील चेतन मेहता व प्रवीण भानत यांच्या घरात कंटेनर घुसला. नागोठणे ते कोलाड दरम्यान मोठ मोठे खड्डे असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. जखमी झालेल्या उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चालकाची अद्याप ओळख पटलेली नसल्याची माहिती कोलाड पोलीसांनी दिली आहे.

Videos similaires