ओबीसी आरक्षण राहिलेच पाहिजे आणि हे आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. हा विषय अनेक वर्ष चर्चेत आहे. हा विषय लवकरात लवकर सुटावा यासाठी कोणीही यात राजकरण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केले.