रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

2022-03-01 79

रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनमध्ये मृत्यू झालेला विद्यार्थी हा मूळचा कर्नाटक हावेरी येथील आहे. त्याची ओळख पटली असून त्याचे नाव नवीन शेखरप्पा असल्याचे सांगितले जात आहे. नवीन याच्या मित्रांनी सांगितले की, युक्रेनच्या खारकिव्ह मधील भारतीय विद्यार्थी जेव्हा ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला निघाले होते तेव्हा युक्रेनच्या पश्चिम सीमेवर ही घटना घडली. भारतीय विद्यार्थी सातत्याने भारत सरकारकडे मदतीची मागणी करत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विद्यार्थ्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अरिंदम यांनी ट्विटरद्वारे माहिती देताना म्हटले की, हे कळविण्यास आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे की, युक्रेन येथील खारकीव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राग गमवावे लागले. मंत्रालय मृत विद्यार्थ्याच्या संपर्कात आहेत. मंत्रालयाने या दु:खद घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, मृत विद्यार्थ्यी आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती आमच्या संवेदना कायम आहेत. त्याच्या कुटुंबीयांबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. इतकेच नव्हे तर परराष्ट्र सचिवांलयाकडून रशिया आणि युक्रेनच्या राजकीय दुतावासासोबत चर्चा करण्यात आली आृहे. युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी दोन्ही दुतावासांना करण्यात आली आहे. खारकीव आणि इतर शहरांमध्ये अद्यापही अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारच्या वतीने जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

Free Traffic Exchange

Videos similaires