अमूल दूध पिता है इंडिया म्हणणाऱ्या अमूल कंपनीनं दूध दर वाढवलेत. आजपासून अमूल दुधाचे दर प्रतिलीटर २ रुपयांनी वाढले आहेत. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं पुन्हा एकदा दूध दरवाढीची घोषणा केली. दरवाढीनंतर प्रतिलीटर अमूल फ्रेश दुधासाठी ४८ रु., अमूल शक्ती दुधासाठी ५४ रुपये आणि अमूल गोल्डसाठी प्रतिलीटर ६० रु. मोजावे लागणार आहेत. वीजदर, पॅकेजिंग, लॉजिस्टिक, पशुंचा चारा आणि दूध उत्पादन खर्चातील वाढ पाहता दूध विक्री दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे होळी सणाआधीच सर्वसामान्य जनता आणि गृहिणींना मोठा झटका बसला आहे. याआधी ७ महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात अमूल दुधाचे दर वाढवण्यात आले.
#AmulHikesMilkPrices #AmulMilk #Amul #AmulProducts #AmulMilkPricesIncreased #MilkPrices #Milk #Marathinews #BigNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup