केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. त्यांचा गावराण साधेपणा आणि भाषेची शैली हा नेहमीच चर्चेता विषय बनलेला असतो. यावेळी मंत्री रावसाहेब दानवे बदनापूर तालुक्यातील दूधनवाडी येथे डब्बा पार्टीत दिसले. रावसाबेब दानवे पक्षातील कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी करत संवाद साधताना दिसले. आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंत्री रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील या डब्बा पार्टी सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या डब्बा पार्टीतून कार्यकर्त्यांसोबत प्रेम वाढते, स्नेह वाढतो. असेही दानवेंनी म्हटलं.