Sakal Special l सिटीझन एडिटर : शेतकऱ्यांना वाली कोण ? | Sakal Media

2022-02-27 88

Sakal Special l सिटीझन एडिटर : शेतकऱ्यांना वाली कोण ? | Sakal Media

कोल्हापूर: शेतकऱ्याकडून एखादी चूक झाली तर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते. कारखानदारांवर मात्र ती वेळ येत नाही. शेतकऱ्याला चौदा दिवसांत बिले देण्याची तरतूद कायद्यात आहे. ती किती जण पाळतात. कायदा मोडणाऱ्यांना कोणी जाब विचारायला जात नाही. शेतकऱ्यांची मुले दुचाकीवरून तिब्बल सीट गेले की, लगेच त्यांना दंड केला जातो. ट्राॅलीतून जादा ऊस वाहतूक करणाऱ्यांना कोणी अडवत नाही. आता तर एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्याचे धोरण आहे. ते करताना शेतकऱ्याचे हित विचारात घेतले गेले नाही. घाम गाळणाऱ्या व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, असेच दिसते आहे.
बातमीदार-सुनिल पाटील
व्हिडिओ-बी.डी.चेचर