tudy In Ukraine या वेब साइटच्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात कारण तेथे वैद्यकीय शिक्षण हे स्वस्त आहे. तसेचयुक्रेनमध्ये मिळवलेली पदवी ही जागतिक आरोग्य संघटना, युरोपियन कौन्सिल आणि इतर जागतिक संस्थांसह जगभरात मान्यताप्राप्त आहे. युक्रेनमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युरोपमध्ये कायमस्वरूपी वास्तव्य आणि स्थायिक होण्याची शक्यता असते. वैद्यकीय शिक्षणाव्यतिरिक्त, काही भारतीय विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी देखील युक्रेनमध्ये येतात.