शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत. यातच युक्रेनमधील बंकरमध्ये ५०० विद्यार्थी अडकले आहेत. गेल्या काही दिवसांत शेकडो विद्यार्थी युक्रेनमधून भारतात परतले. युक्रेन सरकार आम्हाला सहकार्य करायला तयार नाही आहे. बंकर्स पासून काही दहा किलोमीटर अंतरावर बॉम्ब हल्ले सुरु आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची किंवा जेवणाचीही सुविधा नाही आहे. भारत सरकारने यावर लवकरात लवकर पावले उचलावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.