पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांना नवाब मलिक यांच्या अटकेसंदर्भात विचारले असता त्यांनी भाजप नेत्यांकडून होणाऱ्या आरोपांबद्दल नाराजी वक्त केली. तसेच आरोप प्रत्यारोपातून महाराष्ट्र पुढे जाणार नाही असंही ते म्हणाले.
भाजपचा कोणीतरी पहाटे साडेतीन वाजता ट्वीट करतो, मग ईडीची लोकं एखाद्याच्या घरी जातात,हे सगळं सुरू आहे हे सर्वांनाच दिसतंय. फक्त एक पक्ष सोडून बाकी सर्व पक्षाच्या लोकांवर धाडी पडत आहेत. यातून काय बोध घ्यायचा तो जनतेनं घ्यावा, असं अजित पवार म्हणाले.