राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज ईडी कार्यालयातून बाहेर काढण्यात आलं. मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी मलिक यांच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही बोलून गेले. मलिकांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना बघून हातही दाखवला. तरी, २३ फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली. सध्या ते ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत आहेत.
#NawabMalik #NawabMalikLatestNews #NawabMalikEDEnquiry #ED #MumbaiNewsUpdates #MumbaiLiveUpdates #NCP #NawabMalikLiveUpdates #NawabMalikinEDoffice #esakal #SakalMediaGroup