Udayan Raje l खासदार उदयनराजेंचा वाढदिवस उत्साहात; राजमाता कल्पनाराजेंनी केलं औक्षण l Sakal

2022-02-25 492

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस काल जिल्हाभरात विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. जलमंदिर या ठिकाणी खासदार भोसले यांना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी औक्षण केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्यांठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सातारा शहरात काल दिवसभर ठिकठिकाणी खासदार भोसले यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात होते. मुख्य रस्त्यावर मोठमोठे रंगमंच उभारुन कार्यकर्ते शुभेच्छा देताना दिसत होते. शहरातील तालीम संघाच्या मैदानावर रिक्षा सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, रिमांड होम यासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी खाऊ वाटप, ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा केला. शहरातील अनेक भागात पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आठ ते दहा ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच, कोरेगाव, परळी, पुसेसावळी यासह जिल्हाभरात विविध विकासकामांचीही उदघाटने करण्यात आली आहेत. सायंकाळच्या सुमारास खासदार भोसले यांनी शुभेच्छांचा स्विकार केला. दिवसभर खासदार भोसले यांच्या वाढदिवसानिमित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. या वातावरणात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)


#UdayanRaje #UdayanRajeBirthday #UdayanRajeLatestNews #SataraNewsUpdates #SataraliveUpdates #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires