समाजातील विविध घटकांचे प्रश्न समजून घेऊन तळमळीने काम करणारे अनेक तरूण समाजात आजही आहेत. यातील काहींनी गाडगेबाबांच्या कार्यातून प्रेरणा घेतली तर काहींनी बाबा आमटे यांची वाट चोखाळली. आदिवासींच्या विकासासाठी झटणारे अनेक तरुण आज दिसतात. रक्तदान, अवयवदान, स्वच्छता तसेच नवउद्यामी घडविण्यासाठी तळमळीने काम करणार्या व्यक्ती व संस्था आजही कार्यरत आहेत. प्रश्न आहे तो, सरकार, राजकीय नेते वा राजकीय पक्ष समाजसेवेचा यज्ञ चालविणार् यांच्या मागे भक्कमपणे कधी उभे राहाणार? राजकारण आणि समाजकारण या खरतर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत... दुर्दैवाने आजचे राजकारणी समाजकारणापासून दूर दूर जात आहेत... गाडगेबाबांचा वारसा जपू पाहाणार्यांच्यामागे राजकीय नेते उभे राहाणार का हा कळीचा मुद्दा आहे.