राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आलीय. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ईडीने प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. यावर सविस्तर प्रतिक्रिया राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.