: मनात इच्छा-शक्ती तसेच जिद्द असेलतर कुठल्याही परिस्थितीत यशाला गवसणी घालता येते, हे संगीत पार्टीत तमाशा कलावंत असलेल्या नांदेडच्या एका महिलेन दाखवून दिले आहे. सदर महिलेला तीन मुले असून, मोठा आणि दुसऱ्या नंबरच्या मुलाला त्यांनी उच्च शिक्षण दिले असून, दोघेही इंजिनिअर आहेत. तर लहान मुलाला त्या शिक्षण देवू शकल्या नाहीत. दोन्हीही मुले आज लाखो रुपये कमवत आहेत.
संगीत पार्टित तमाशा कलावंत अनुराधा या नृत्य करून उदरनिर्वाह करत आहे. हलाखीची परिस्थिती असतानाही, मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्ठ व्हावं या एकाच उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. त्यांना मोठं केलं. दोघांनीही जिद्दीने अभियंत्याचे शिक्षण पूर्ण करून लाखो रुपये कमवत आहेत. कलावंत म्हणून नृत्य सादर करताना शौकीन लोकांनी उधळलेल्या पैश्यातुन अनुराधा यांनी ही किमया करून दाखवली आहे.
#nanded #nandednews #dancers #tamasha #artist #tamashaartist #kalavant #tamashakalavant