या गावात केळीची रोपंही तयार होतात आणि केळी पिकवलीही जाते

2022-02-19 36

केळीची शेती म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे जळगाव जिल्हा. पण विदर्भातही असं एक गाव आहे जे केळीची रोपं तयार करतं, वाढवतं आणि दर्जेदार केळी पिकवून त्याची बाजारात विक्रीही करतं. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या पणज, बोचरा, शहापूर, बाघोडासह इतर गावातील शेतकऱ्यांनी केळी पिकाला प्रथम पसंती दिलीय. येथेच जय हनुमान टिशू कल्चर प्रयोग शाळा उभारण्यात आलीय. ही केळी ऊती संवर्धन प्रयोग शाळा आहे. त्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा कमी किंमतीत रोपं शेतकऱ्यांना मिळतात आणि त्याचा फायदाही होतो. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...