उत्तर प्रदेशात उद्या म्हणजेच २० फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड आणि अवध अशा तीन विभागांमध्ये विभागलेल्या १६ जिल्ह्यांमधील ५९ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या करहल मतदारसंघातही मतदान पार पडतंय. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ६० टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले होते.
#upelections #upelectionsphase3 #phase3elections #elections #up #upphase3elections