किल्ले शिवनेरी वरील शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमानंतर तेथील भाषणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजितदादा संतापलेले दिसले. तू कोणाची सुपारी घेऊन आलास काय?, अशी विचारणा अजितदादांनी त्याला केली. त्याच वेळी मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील हे मराठ्यांच्या पोटचे नाही का? आम्हाला जातीचा अभिमान नाही का? परंतु शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की सर्वांना, सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाचे काढून घेऊन नव्हे, तर सर्व समाजांना बरोबर घेऊन सर्वांना न्याय मिळवून आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे असे अजितदादा म्हणाले.