Pragya Singh on Hijab l घरात सुरक्षित नसाल तरच हिजाब घाला- साध्वी प्रज्ञा l Sakal

2022-02-17 123

Pragya Singh on Hijab l घरात सुरक्षित नसाल तरच हिजाब घाला- साध्वी प्रज्ञा l Sakal

हिजाबमुळे सध्या देशात वातावरण ढवळून निघालं आहे. कर्नाटकच्या (Karnataka) एका शाळेतून सुरु झालेल्या या वादाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. त्यानंतर आता यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या भाजप नेत्या आणि खासदार साध्वी प्रज्ञा (Sadhvi Pragya) यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे. कुठेही हिजाब घालण्याची गरज नाही. जे लोक त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत त्यांनी हिजाब घालणं आवश्यक आहे. बाहेर असताना, जिथे जिथे ‘हिंदू समाज’ आहे, तिथे त्यांना हिजाब घालण्याची गरज नाही, विशेषत: ज्या ठिकाणी ते अभ्यास करतात, तिथेही हिजाबची गरज नाही असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केलं आहे. (Sadhvi Pragya on Hijab Row)

#PragyaSinghonHijab #HijabControversy #HijabLatestNews #Hijab #MarathiNews #BreakingNews #PragyaSinghLatestNews #BigNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires