कोरोना काळात देशात इंधनाच्या किमती गगणाला भिडल्या. त्यात वाढते प्रदूषण पाहता लोक पेट्रोल बाईक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक बाईक्सला जास्त प्राधान्य देऊ लागलेत. नांदेडमध्ये फुल उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर कल्याणकर यांनी लॉकडाऊनमध्ये एक हायटेक जुगाड केलाय. वाहतूकीचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बाईक बनवलीय. यासाठी शेतकऱ्याला चाळीस हजार रुपयांचा खर्च आला. ही बाईक फक्त १४ रुपयांच्या खर्चामध्ये चार तास चार्ज केल्याने तब्बल १०० किमीचे अंतर पार करतेय. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...