बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित 'द फेम गेम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त

2022-02-15 40

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने 'द फेम गेम' सिरीजमधून डिजिटल डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही सिरीज 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून 'द फेम गेम'ची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माधुरी दीक्षितचा हा पहिला डिजिटल डेब्यू असून तिला मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या सिरीजमध्ये माधुरी अनामिका आनंदची भूमिका साकारत असून कथा अनामिकाच्या भोवती फिरताना दिसते. 'द फेम गेम'मध्ये संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन आणि सुहासिनी मुळे, मुस्कान जाफरी यांच्याही भूमिका आहेत. माधुरी दीक्षित अनेक दिवसापासून कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. ती करण जोहरच्या 'कलंक' या चित्रपटात शेवटची दिसली होती.

Videos similaires