वाशीच्या खाडीमध्ये आज डॉल्फिन मासा पहायला मिळाला. मासेमारी करणाऱ्या युवकाने पाण्यामधून बाहेर उडी मारणाऱ्या डॉल्फिन माश्याचं हे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केलं आहे. मागील वर्षी देखील नवी मुंबईत डॉल्फिन पाहायला मिळाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आता नवी मुंबईकर डॉल्फिनला पाहण्यासाठी खाडी किनारी गर्दी करताना दिसत आहेत.
#Dolphin #Vashi #Mumbai #ViralVideo