'गेहराईयाँ'चं स्पेशल स्क्रिनिंग; दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा स्पॉट

2022-02-10 5

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा ओटीटीवरचा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. यात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल. गेहराईयाँ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'गेहराईयाँ'च्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री सान्या मल्होत्रा, चंकी पांडे, कल्की, सोफी चौधरी गेहराईयाँच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होते.

Videos similaires