सुप्रसिद्ध कुस्तीपटू खलीने केला भाजपमध्ये प्रवेश; पंतप्रधान मोदींचे कौतुक

2022-02-10 76

'द ग्रेट खली' या नावाने प्रसिद्ध असलेल्या दलीप राणाने भारताला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. WWE सारख्या आंतरराष्ट्रीय खेळातून जगभर नाव कमवणारा 'द ग्रेट खली' यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. दलीप राणा हे पंजाब पोलिसात कर्मचारी राहिले आहेत. दलीप राणा यांनी पंजाब पोलिसाची नोकरी सोडून WWE मध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, बॉलिवूडमध्येही हात आजमावला आहे. आता 'द ग्रेट खली'ची राजकारणात एंट्री झाल्याने सगळेच अचंबित आहेत. हिमाचल प्रदेशचा असलेल्या द ग्रेट खलीने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. मोदींच्या रूपाने देशाला योग्य पंतप्रधान मिळाला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.