गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक झाला आहे. निधनाने सर्वच स्तरातून शोक होत असताना अनेकांनी विविध माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. जळगाव जिल्ह्यात ओजस्विनी कला महाविद्यालयातर्फे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. तब्बल 40 बाय 40 फुटांच्या जागेत 500 किलो रांगोळीचा वापर करत तिरंग्यातून ही भव्य रांगोळी साकारली आहे. महाविद्यालयातील पाच शिक्षकांसह १२ विद्यार्थ्यांच्या एकजुटीने 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही रांगोळी पूर्ण झाली.