अ‍ॅक्शन हिरो अजय देवगण, बॉलिवूड क्वीन क्रिती सेननसह तमन्ना भाटिया स्पॉट

2022-02-09 5

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता अजय देवगण ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'रुद्र' या वेबसिरिजद्वारे ब्रिटीश सायकॉलॉजिकल ड्रामा डेब्यू घेऊन येत आहे. यावेळी अजय देवगण डबिंगसाठी साउंड स्टुडिओमध्ये जाताना स्पॉट झाला. त्यासोबतच अभिनेत्री क्रिती सेनन देखील डबिंगसाठी साउंड स्टुडिओमध्ये दिसली. यावेळी क्रिती ऑल इन ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. क्रितीनेही आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. दुसरीकडे अभिनेत्री तमन्ना भाटिया डीडब्ल्यूडी डान्स फॅक्टरीबाहेर स्पॉट झाली. यावेळी ती ऑल इन पिंक आऊटफिटमध्ये दिसली. तिने चाहत्यांना फोटोसाठी पोजेस दिल्या. तिच्या अनेक सिनेमांना दक्षिणेकडील रसिकांनी डोक्यावर घेतलं असून तमन्नाचे चित्रपट सुपरहिट आहेत.