अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अंगावर शाई फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या मुद्द्यावरून संघटनेकडून ही शाईफेक झाल्याचा अंदाज आहे. या घटनेमुळे अमरावती शहरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे.