'माझ्या आईला फोर्ब्स काय असतं कळत नाही, पण लेकरू मोठं त्याचं समाधान आहे'

2022-02-08 1

फोर्ब्स या नामांकित मासिकात दरवर्षी वेगवेगळ्या याद्या प्रकाशित होतं असतात. जगभरात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लोकांची यादी यामध्ये प्रकाशित केली जाते. त्यांनी समाजासाठी नेमकी कोणती कामगिरी केली? याची माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे या यादीत आपलंही नाव असावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांची इच्छा बहुतांशी वेळा पूर्ण होत नाही. पण बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका शेतकऱ्याच्या पोरानं मात्र कमाल केली आहे. ज्याची दखल फोर्ब्स या मासिकानं देखील घेतली आहे.