कऱ्हाड ः सहा महिन्यापूर्वी कऱ्हाड, सांगलीसह कोल्हापूरच्या विविध पुजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानावर छापे टाकून वन विभागाने श्वापदांच्या अवयवापासून तयार होणाऱ्या सहित्यांची विक्री रोखली होती. त्या गुन्ह्याचा तपास करताना हाती आलेल्या माहितीनुसार सातारा व सांगली जिल्ह्यातील वन विभागाच्या स्थापन झालेल्या विशेष शोध पथकाने नाशकात कारवाई केली. त्यात दुर्मिळ श्वापदांचे अवयव व त्यापासून तयार केलेले साहित्य छाप्यात जप्त केले आहे. नाशिक येथे आज दुपारी लक्ष्मी पूजा साहित्य भांडारावर छापा टाकला. त्यात दुकानचालक बबन कुलथे (रा. नाशिक) यास अटक झाली आहे. (व्हिडिओ : सचिन शिंदे)
#karad #superstition #karad #satara #rituals #animals