पुणे, ता. ५ : पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला.
सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना सोमय्या खाली पडले. सोमय्या यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून लावून देण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड खळबळ उडाली. याचे राजकीय पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.
#kiritsomaiya #bjp #shivsena #shivsainik #bjp #attackonkitisomaiya