करिष्मा तन्ना-वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकणार; हळदीचे व्हिडिओ व्हायरल

2022-02-04 3

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री करिष्मा तन्नाच्या घरी लगीनघाई सुरु आहे. करिष्मा तन्ना ५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच करिष्मा आणि वरुण बंगेराचा हळदी समारंभ पार पडला. हळदी समारंभासाठी करिष्माने खास पेहराव केला होता. व्हाईट आऊटफिट आणि त्यावर व्हाईट फ्लोरल ज्वेलरीत करिश्माने धम्माल पोझ दिल्यात. हळदीचे काही फोटो तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले आहेत. करिश्मा-वरुण यांचा विवाह दोन पद्धतीने होणार आहे. लग्न गुजराती आणि दक्षिण भारतीय परंपरेनुसार होणार आहे. करिष्मा आणि तिचा बॉयफ्रेंड वरुण बंगेरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'अदालत' या मालिकांमधून करिष्मा घराघरात पोहोचली. तसेच 'बिग बॉस ८', 'नच बलिये' या रिऍलिटी शोमध्येही तिने सहभाग घेतला होता. दरम्यान 'खतरो के खिलाडी १०' या रिऍलिटी शो ची विजेती ठरली होती.