निर्माती एकता कपूरने तिच्या नवीन रिअॅलिटी शोची घोषणा केली आहे. मनोरंजन विश्वातील सर्वात खतरनाक शो म्हणून ओळखला जाणार आहे. अभिनेत्री कंगना रनौत एकता कपूरच्या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून कंगना पहिल्यांदाच शो होस्ट करताना दिसणार आहे. हा एक लाईव्ह शो असणार आहे, जो ALT बालाजी आणि MX Playerवर प्रसारित होईल. कंगनाची बॉलिवूडमधील मोजक्याच लोकांशी मैत्री आहे. एकता ही त्यापैकीच एक आहे. 'शूटआऊट अॅट वडाळा' या चित्रपटात दोघींनी पहिल्यांदा एकत्र काम केले. कंगनाने एकताच्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटातही काम केले आहे.