लातूर जिल्ह्यात 17 लाखांच्या सोयाबीनची चोरी, सहा आरोपींना अटक

2022-02-03 14

लातूर जिल्ह्यातील खंडापूर शिवारातील बालाजी वेयरहाउस येथे काल 17 लाख रुपयांच्या सोयाबीनची चोरी झाली. लातूर एमआईडीसी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीला गेलेले सोयाबीन शेतकऱ्यांना परत मिळाले. चोरटे 548 कट्टे सोयाबीन दोन ट्रकमध्ये टाकून पसार झाले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. सोयाबीन चोरणाऱ्या चोरांबद्दल पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली. त्यावरून माहिती काढत पोलिसांनी सोयाबीन आणि दोन ट्रक जप्त केले. चोरी गेलेल्या सोयाबीनचा पंचनामा करून ते शेतकऱ्यांना परत केले जाईल अशी माहिती पोलिसांनी आहे. दरम्यान सोयबीनचे चोरी करणाऱ्या टोळक्याला लातूर एमआईडीसी पोलीस ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Videos similaires