सातारा : शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने आज येथे दंडवत-दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बंडातात्या कऱ्हाडकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका केली. हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केल्याने विलासबाबा जवळ व कार्यकर्त्यांसोबत पोलिस अधिकाऱ्यांचा वाद झाला. यावेळी अचानक आंदोलनात सहभागी झालेल्या बंडातात्या कऱ्हाडकर यांनी विविध मान्यवर नेत्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)
#satara #stopalcoholconsumption #stopalcohol #alcohol #bandatatyakaradkar #sataranews