ज्यांच्यामुळे नितेश राणे तुरुंगात गेले, ते संतोष परब काय म्हणाले

2022-02-03 856

नितेश राणे यांना अटक झाल्यामुळे मला न्याय मिळाला आहे असे शिवसैनिक संतोष परब यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळाला. दहशत पसरवायची आणि निवडणुका जिंकायच्या हा राणे फॅमिलीचा डाव आहे. तो नितेश राणे यांच्या अटकेने उधळला गेला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत दहशत पसरवून निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या दहशतीमुळे आमचे काही संचालक किरकोळ मतांनी पडले आहेत. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदा या हल्ला प्रकरणातील एक आरोपी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर बसला आहे. या प्रकरणातील आणखीन एक आरोपी अजूनही फरार आहे. तो नेहमी नितेश राणे यांच्या सोबत असतो. तो म्हणजे गोट्या सावंत. त्यालाही अटक झाली पाहिजे. आणि त्यानंतर या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे

Videos similaires