बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मंगळवारी आपल्या नवीन घरी चित्रपटानिमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अभिनेत्री कंगना रणौत, अवनीत कौर यांनी हजेरी लावली होती. यावेळी नवाजुद्दीन आणि अवनीतने काळ्या रंगाचे मॅचिंग आऊटफिट परिधान केले होते. अवनीतने व्हॉल्युमिनस स्लीव्हज आणि हाय-स्लिट सॅटिन स्कर्टसह ब्लॅक क्रॉप टॉप घातला होता. तर कंगनाने पांढऱ्या रंगाची स्टायलिश साडी सोबतच डायमंड पेअर नेकलेस सुद्धा परिधान केला होता.