नारायण राणेंचे पुत्र नितेश यांची घाबरगुंडी उडाल्याचा, त्यांची तंतरल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली. त्यामुळे निलेश राणे चांगलेच तापले. पोलीस आणि निलेश राणे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निलेश राणे पोलिसांशी हुज्जत घालायला लागले. नितेश राणे स्थानिक आमदार आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टानं अटकेपासून संरक्षण दिलंय, दहा दिवसांची मुदत दिलीय, कोणत्या अधिकाराखाली त्यांना अडवत आहात असा सवाल निलेश राणेंनी पोलिसांना विचारला. पोलिसांची दादागिरी सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला. पण हे सारं सुरु असताना नितेश राणेंचं मात्र काहीतरी वेगळंच सुरु होत. नितेश राणेंची सपशेल घाबरगुंडी उडाल्याचं पाहायला मिळालं. जाऊ दे ना निलेश नको ना, वकिलांना बोलू दे ना असं नितेश राणे बोलायला लागले. इतके ते घाबरले होते. पण विधानभवनाच्या पायऱ्यांवर म्याव म्याव करणारे नितेश राणे इतके का घाबरले, नितेश राणेंचा रुबाब कुठे गेला, कधीही अटक होईल अशी भिती नितेश राणेंना वाटत होती का... यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात नितेश राणेंची कशी तंतरली ते...Aniket vo
#Niteshrane #Nileshrane #Narayanrane #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat