१० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईन नको तर ऑनलाइन घेतल्या पाहिजेत या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने केली. विशेषतः आज दुपारी मुंबईत धारावी येथील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. या सर्व प्रकाराबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. एकावेळी एवढे विद्यार्थी जमा होऊ शकत नाहीत, त्यांच्या मागे कोण तरी असण्याची शक्यता आहे, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन योग्य नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.