वाशिम जिल्ह्यात ७५ कोटींचे सूर्यनमस्कार महासंकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिममधील युवक व बालकांना सूर्यनमस्कार आणि योग अभ्यास देण्यात येत आहे. ७५ वा अमृत अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध सामाजिक संस्थांनी ही मोहिम सुरु केलीय. २३ जानेवारी पासून या अभियानाला सुरुवात झाली असून 31 जानेवारी पर्यंत सामूहिकरीत्या राबवण्यात येणार आहे. तसेच १ फेब्रुवारीपासून ७ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक रित्या कोरोना नियमांचे पालन करत हे अभियान सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.