सतत वेगवेगळ्या वक्तव्यातून चर्चेत राहणारी राखी सावंत जिमबाहेर स्पॉट झाली. कॉन्ट्रव्हर्सी किंग बिचुकलेने अभिनेता सलमान खानच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. दुसरं कुणी मोठं होत असेल तर ते सलमानला बघवत नाही, सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे असं बिचुकले म्हणाले. त्यावर आता ड्रामा क्विन राखी सावंत हिने प्रतिक्रिया देत अभिजीत बिचुकलेला थेट इशारा दिलाय. भडकलेली राखी सावंत अभिजीत बिचकुलेला म्हणाली, मैं तुझे उलटा लटका दूँगी... बिचुकले हर जगह चुकले, असं म्हणत तिने अभिजीत बिचुकलेलाच थेट इशारा दिलाय.