राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी नाशिकच्या गंगापूर डॅमला भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी ओपन ट्रॅव्हल बोटीतून मनमुराद सफर केली. नाशिकची थंडी आदित्य ठाकरेंना आवडली, नाशिक हे अप्रतिम शहर आहे असंही ते यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांना नाशिक पर्यटन सुंदर वाटलं. येथील पर्यटनाबाबत लवकरच निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हणाले.