Ratnagiri l नवीन मच्छिमारी कायद्याविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसीन मच्छिमार आक्रमक l Sakal Media
नवीन मच्छिमारी कायद्याविरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसीन मच्छिमार आक्रमक झालेत. पर्सेसीन बोटीवर काळे झेंडे दाखवत मच्छिमारांनी नवीन मच्छिमारी कायदा आणि सरकारचा निषेध केला. प्रजासत्ताक दिनाला पर्सेसीन मासेमारी बंद ठेवत पर्सेसीन मच्छिमारांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. नवीन कायद्यामुळे पर्सेसीन मच्छिमार अडचणीत येणार आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी राजिनाम्याची मागणी पर्सेसीन मच्छिमारांनी केलीय. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरात मच्छिमार रस्त्यावर उतरले होते. हा कायदा रद्द करण्यासाठी पर्सेसीन मच्छिमारांनी जोदार घोषणाबाजी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, नाट्ये, पुर्णगड, जैतापूर बंदरातील बोटींवर काळे झेंडे पहायला मिळत होते.