परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने 5 हजार 730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारीपासून लॉटरीसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही माहिती दिली. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत. २६ जानेवारी पासून सकाळी 11 वाजल्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवार 27 जानेवारी 2022, दुपारी 12 वाजल्यापासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 25 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार आहेत.